तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथ नॅशनल हेवी इंजिनिअरींग कंपनीजवळ बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास एका तरुणाचा खून झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.खून करणारा मृताचा सख्ख्या चुलत भाऊ असून त्याने त्याच्या मित्राच्या सहाय्याने आपल्या अल्पवयीन भावाची डोक्यात हातोडीच्या तीक्ष्ण टोकाने घाव घालून बुधवारी रात्री निर्घृण हत्या केलीदशांत अनिल परदेशी (वय १७, रा. तळेगाव दाभाडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील अनिल परदेशी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे १) कमलेश सुरेश परदेशी वय २० वर्ष (मयताचा सख्खा चुलत भाऊ) २) प्रकाश संजय लोहार वय १९ वर्ष दोघेही रा.खडक मोहल्ला, भोई आळी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे अशी आहेत.
दिलेल्या फिर्यादीनुसार दशांत हा दि. २२ रोजी सायंकाळी ५ च्या दरम्यान आपली दुचाकी क्रमांक एमएच १४ - जेव्ही ८७८४घेऊन बाहेर गेला व घरी लवकर परत आला नाही. घरातील सर्वजण त्याचा शोध घेत होते. रात्री शोध घेत असताना येथील नॅशनल हेवी कंपनीच्या जागेत त्याची दुचाकी आढळून आली. या वरून त्या परिसरात पहिले असताना रस्त्यापासून काही अंतरावर त्याचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला. दिशांत व आरोपी कमलेश व प्रकाश हे तिघे पहिले मित्र होते. काही महिन्यापूर्वी त्यांच्यामध्ये भांडण झाले. त्याचा राग डोक्यात धरून आरोपींनी दिशांत याला फोटो काढावयाचे आहेत असे सांगूनतळेगाव खिंडी जवळील नॅशनल हेवी कंपनीच्या जागेत निर्जन ठिकाणी नेले. व फोटो काढत असताना त्याच्या डोक्यात हातोडीच्या धारदार टोकाने घाव घातले. त्यामुळे तो जागेवर कोसळला मरण पावला.त्यानंतर ते दोघेजण त्या ठिकाणावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडचे आयुक्त कृष्णप्रकाश,उपायुक्त अनंत भोईटे,काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, संजय नाईक पाटील तसेच तळेगाव दाभाडे पोलीसस्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत घटनास्थळी दाखल झाले. ही घटना पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर घडल्याने पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान होते.
शोध घेत असताना दिशांत याला आलेल्या शेवटच्या मोबाईल रेकार्ड वरून मोबाईल करणाराचा नंबर मिळाला. तो मोबाइल धारक शोध मोहिमेच्या ग्रुपमध्येच होता, पोलीसांना त्याचा संशय आला. त्याला पोलिसीखाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देऊन दुस-या साथीदाराचे नाव सांगितले. व पोलिसांनी त्यालाही अटक केली.
मृत दशांत हा तळेगाव दाभाडे येथील आदर्श विद्या मंदिर येथे इयत्ता ११ वी मध्ये कला शाखेत शिकत होता. त्याला तीन बहिणी आहेत. त्याचे आई वडील मासेमारी करून विक्रीचा व्यवसाय करत होते. या घटनेने या परीसरात शोककळा पसरली आहे.
तळेगाव येथे चुलतभावानेच केला तरुणाचा खून
Reviewed by ANN news network
on
१२/२३/२०२१ ०९:२२:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: