Police e news

मावळातील 40 ग्रामस्थांना अन्नातून विषबाधा

पिंपरी : मावळ तालुक्यातील पवन मावळ येथील भडवली गावात गुरुवारी काकडा आरती झाल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रामस्थांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. 35 ते 45 नागरिकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये सहा ते सात मुलांचा समावेश आहे. या सर्वांना काळे पवनानगर आणि कान्हे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. मात्र, बहुतांश लोकांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. रुग्णालयातील तीन वॉर्ड भरले असून, सुमारे २८ ते ३० जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. काही गंभीर लोकांना कान्हेफाटा ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. रुग्णांमध्ये समाविष्ट मुलांची प्रकृती आता ठीक आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ.इंद्रनील पाटील, डॉ.वर्षा पाटील, डॉ.विश्वंभर सोनवणे, डॉ.पोपट आधाटे, डॉ.शिवराज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. लोणावळा ग्रामीण व वडगाव मावळचे वरिष्ठ पोलीस अधिकारीही आढावा घेत आहेत.पवनानगर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. वर्षा पाटील यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी अचानक भडवली गावातून गावातील लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याचा फोन आला. तेथे तातडीने रुग्णवाहिका पाठवून उपचार सुरू करण्यात आले. या लोकांना उलट्या, जुलाब, चक्कर येणे, मळमळणे अशा तक्रारी होत्या. यातील ५ ते ६ जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना औंध रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मात्र, हा कार्यक्रम झालेल्या मंदिराजवळील अंगणवाडी शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील पाणी अन्न शिजवण्यासाठी वापरण्यात येत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली. लॉकडाऊनमुळे या टाकीची अनेक दिवसांपासून स्वच्छता झाली नाही. त्यामुळे त्याचे पाणी दूषित झाले असून अन्न शिजवताना त्याचा वापर केल्याने विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.
मावळातील 40 ग्रामस्थांना अन्नातून विषबाधा मावळातील 40 ग्रामस्थांना अन्नातून विषबाधा Reviewed by ANN news network on ११/१७/२०२१ ११:०४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.