Police e news

‘मला प्रेयसीबरोबर लग्न करायचे आहे, तू आत्महत्या कर!’ असे सांगत पत्नीचा छळ

पुणे : मला प्रेयसीबरोबर लग्न करायचे आहे. तु आत्महत्या कर आणि माझ्या आयुष्यातून निघून जा असे धमकाविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २९ वर्षाच्या महिलेच्या फिर्यादीनंतर चतु:श्रृंगी पोलिसांनी प्रतिक कांबळे (वय ३१, रा. अलिबाग) याच्यासह त्याच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार अंबरनाथ आणि चर्हो३ळी येथे ३ फेब्रुवारी ते २५ जून २०२१ दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पती व सासूसासरे यांनी संगनमत करुन सासुबाई यांच्या उपचारासाठी माहेरहून ५० हजार रुपये घेऊन ये अशी फिर्यादीकडे वारंवार मागणी केली. प्रतिक कांबळे याने फिर्यादी यांना मला प्रेयसीबरोबर लग्न करायचे आहे. तू आत्महत्या कर व माझ्या आयुष्यातून निघून जा, असे म्हणून शिवीगाळ करुन मारहाण केली. फिर्यादी यांचा मानसिक व शारीरीक छळ केल्याने त्या माहेरी निघून आल्या. त्यानंतर आता त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक माळी तपास करीत आहेत.
‘मला प्रेयसीबरोबर लग्न करायचे आहे, तू आत्महत्या कर!’ असे सांगत पत्नीचा छळ ‘मला प्रेयसीबरोबर लग्न करायचे आहे, तू आत्महत्या कर!’ असे सांगत पत्नीचा  छळ Reviewed by ANN news network on ११/१७/२०२१ ११:०४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.