लोणावळा : रायगड जिल्ह्यातील उंबरे, ता. खालापूर येथून आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त पायी जाणा-या दिंडीत शनिवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ च्या सुमारास मावळ तालुक्यातील साते, कान्हेफ़ाटा येथे भरधाव वेगाने जाणारा पिकअप टेम्पो शिरला. त्याखाली सुमारे २५ ते ३० वारकरी महिला चिरडल्या गेल्या. यामधील ४ महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला. २५ जखमी झाल्या. ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. पिकअप टेम्पोचा चालक दारू प्यायलेला होता. त्याला वडगाव मावळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सविता वाळकू येरम (वय ५५ उंबरे, ता. खालापूर जि. रायगड) जयश्री आत्माराम पवार (वय ५५ रा.भूतीवली, ता. कर्जत जि. रायगड), विमल सुरेश चोरघे (वय ५० रा. बीडखुर्द ता. खालापूर), संगीता वसंत शिंदे (वय ५६ रा. कर्जत ता.खालापूर)अशी अपघातात मृत्यू झालेल्या महिला वारकऱ्यांची नावे आहेत. जखमी वारक-यांची नावे पुढीलप्रमाणे मंदा बाबू वाघमारे (वय २५ रा. उंबरे), वनिता बबन वाघमारे (वय ३५, रा. उंबरे), रंजना गणेश वाघमारे (वय ३२ रा. पाली), राजेश्री राजेश सावंत (वय ३५, रा. खोपोली), सुरेखा तुळशीराम करनुक (वय ६०, रा. बीड खुर्द), वंदना राम करनुक (वय ६० रा. बीड खुर्द), माणिक बळीराम करनुक (वय ८०, रा. बीड खुर्द), दिव्या दीपक चांदुरकर (वय ४२ रा. उरण), आशा अनंता साबळे (वय ५० रा. वडप), शारदा चंद्रकांत अहिर (वय ६० रा. उंबरे), सुमित्रा बबन चोरघे (वय ६५ रा. बीड खुर्द), पुष्पांजली दिलीप करनुक (वय ६५ ,रा. खोपोली), सुभद्रा सीताराम शिंदे (वय ७० रा. खोपोली), बेबी रामदास सावंत (वय ४९ रा. कर्जत), विमल सुरेश चोरघे (वय ५०, रा. बीड खुर्द), सुनंदा सदाशिव चोरघे (वय ५०, रा. बीड खुर्द), रंजना अशोक करनुक (वय ५५ रा. बीड खुर्द), राधिका बाळकृष्ण भगत (वय ४० रा. बीड खुर्द), पुष्पा गणपत पालकर (वय ४० रा. बीड खुर्द), अनुसया बंडू जाधव (वय ४५ रा. उंबरे), शोभा चंद्रकांत सावंत (वय ५५ रा. साळवट), अनुसया मधुकर जाधव (वय ५५, रा.बीड खुर्द), बेबी लक्ष्मण करनुक (वय ५६ रा. बीड खुर्द), ताई बबन वाघमारे (वय ५० रा. बीड खुर्द) आदी जखमी असुन सर्व ता.खालापूर जि.रायगड येथील रहिवासी आहेत.
वडगांव व कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट पायी दिंडी उंबरे ता. खालापूर ही मंगळवार (दि.३०) रोजी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त जात असताना, साते फाटा (मुंबई-पुणे महामार्गावर) एम एच १२ एस एक्स ८५६२ क्रमांकाचा टेम्पो चालक राजीव प्रमोद चौधरी (वय ३० रा. वाघोली, पुणे) यांने भरधाव वेगाने टेम्पो पायी जाणाऱ्या दिंडीतील महिलांच्या अंगावर घालून त्यांना चिरडले. यात २४ पेक्षा जास्त महिलां गंभीर व किरकोळ जखमी झाल्या. हा अपघात इतका भीषण होता की, अपघाताच्या ठिकाणी रक्ताचा सडा पडला होता. महिलांच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले.
माजी मंत्री बाळा भेगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस करून त्यांना धीर दिला.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक मित्तेश घट्टे, उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील व पोलीस निरीक्षक विलास भोसले आदींनी घटनास्थळी व जखमींची विचारपूस केली. जखमींसाठी ए.बी.पॊझिटिव्ह रक्ताची गरज असून रक्तदात्यांनी खालील रुग्णालयांशी तातडीने संपर्क साधावा महावीर हॉस्पिटल कामशेत - 9822403422 बडे हॉस्पिटल कामशेत - 8383838371 बडे हॉस्पिटल सोमाटणे फाटा - 77698 81188 पवना हॉस्पिटल - 7722049970 कान्हे ग्रामीण रुग्णालय - 9763712743
मद्यधुंद टेम्पोचालकाने आळंदीला जाणा-या दिंडीतील वारक-यांना चिरडले! ४ महिलांचा मृत्यू; ६ गंभीर
Reviewed by ANN news network
on
११/२७/२०२१ ०१:०४:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: