लोणावळा:- अहमदनगर येथून खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ येथे देव दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या महेंद्रा पिकअपच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात दोन ठार, २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये १९ पुरुष, पाच महिला व पाच लहान मुलांचा समावेश आहे. हा अपघात मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील वलवण पुला जवळ झाला आहे. पिकअप वाहन चालक संदिप ज्ञानेदव भालके (वय-४१, रा. कोठे बुद्रुक,। सगमंनेर,अहमदनगर) व दिपक सुभाष कडाळे (वय-१८, रा.पिंपळदरी, अकोले, अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर जखमींमध्ये अक्षय पंढरी कडाळे, अजय भाऊसाहेब कडाळे, राकेश कडाळे, निलेश कडाळे, विजय शिवाजी मेंगाळ, रेवन कडाळे, अवदुत मधे, अर्जुन कडाळे, करण कडाळे, संतोष पारधी, विलास कडाळे, प्रविण दिंगबर भगत, विजय ज्ञानदेव कडाळे, ओंमकार प्रकाष कडाळे, लक्ष्मी कुंडलीक कडाळे, रेश्मा पारधी, काजल कडाळे (सर्व रा.पिंपळदरी ता. अकोले जि.अहमदनगर), अमोल सावळेराम दुधवडे (रा. करजुले पठार,संगमनेर, अहमदनगर) करण सुदाम उघडे (वय-१९, व रा.गुंजाळवाडी, संगमनेर, अहमदनगर) तसेच इतर पाच महीला व पाच लहान मुले (पुर्ण नाव माहीत नाही) यांचा समावेश आहे. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मधील पिंपळदरी व परिसरातील भाविक हे अहमदनगर येथून खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ येथे देवदर्शनासाठी महेन्द्रा पिकअप वाहनाने (क्रमांक- एमएच-१४/जीयु-९२२७) जात होते. मंगळवारी पहाटे अडीच सुमारास भरधाव वेगात वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने महेंद्रा पिकअप गाडी लोणावळ्यातील वलवण गावच्या हद्दीत जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर जोरात धडकली. या भीषण घडकेत वाहन चालकासह एकाचा जागीच मृत्यू झाला असून, सुमारे २५ भाविक जखमी झाले आहेत. यामध्ये १५ जण गंभीर तर १० जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिस व मार्गावरील देवदूत आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना उपचारासाठी तत्काळ नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर काही गंभीर जखमींना सोमाटणे येथील पवना हॉस्पिटल व काहींना पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्या ठिकाणी जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहरचेसहायक पोलिस निरीक्षक संदेश बावकर हे करीत आहेत.
Random Posts
randomposts
News Portals
Tags
किरकोळ गुन्हे वृत्त
aanand bhoite
ACB raid
accident
ankush shinde
army
arrested
Assault on greenmarshal
ATM breaking
atrocity case
baburao gholap college
Baramati
beed
beef
bhosari
bhosari police
Bhumkar chauk
bike theft
border road organization
Breach of Trust
BRO
bus accident
chain snatching
chakan
chakan police
chandkhed
chikhali
chikhali police station
chinchwad
chinchwad police station
CME
corona positive
cow theft
crime news
dapodi
dehuroad police
Deth
DRI
Drowning
dudulgaon
Dwarka lodge
fraud
gajanan chinchwade
Girl
hanging
harassment of a married woman
hinjawadi police station
hotel dreamland
hrishekesh
Indapur
irani gang arrested
kamgarnagar
khadki
kharalwadi
kishor aaware
kivale
Konkan
krishnaprakash
kurvande
kusgaon
Lady police constable died due to dengue
liquor
Lohagad
lonavala
Lonavala gramin police
lonavala police station
lpnavala police station
Madap tunnel
mahalunge
Maharashtra
Maval
milind achyut
Minor Girl missing
Missing
mobile snatching
moshi
Mumbai
Mumbai Pune expressway
murder
murderer arrested
Nanekarwadi
nashik phata
National
new Mumbai
newyear
nigadi police
Patange
pavana Dam
PCMC
pcmc
pcpc
pcmc latest news
pcpc
pcpc. pcmc
phangane
pimple gurav
pimple saudagar
pimpri
Pimpri Chinchwad
pimpri chinchwad news
pimpri chinchwad police
Pimpri police
police
police day
police raid
pratiksha ghule
prostitution
PSI
Pune
pune district
Pune gramin
Pune Municipal corporation
pune police
rahatani
raid on brothel
retion blackmarket
retirement
rupeenagar
sabgavi
sangavi
scam
sexual harassment
sexual harrasment
shirur
sit
somatane phata
state excise department
sudhakar shelke
suicide
Talegaon Dabhade
talggaon dabhade
theft
Thergaon tax office
thief arrested
traffic control
transfer
triveninagar
unauthorized liquor seized
video
wadgaon maval
wakad
wakad police station
Recent Posts
recentposts
Created By SoraTemplates | Distributed By Gooyaabi Templates
Blogger द्वारे प्रायोजित.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: