पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नी आणि बहिणीच्या घरगुती वादामुळे रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या बहिणीने आत्महत्या केली. दरम्यान, हा प्रकार भावाला समजताच त्याने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली. यानंतर त्यांनी स्वतः विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माया सोपान सातव (वय ३५) असे या खळबळजनक घटनेत आत्महत्या केलेल्या बहिणीचे नाव आहे. तर वैशाली समीर तावरे (वय ३०) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. हत्येनंतर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव समीर भावजी तावरे (वय ४२) असे आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीरवर दौंड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मांडवगण फराटा येथील जुना मळा येथे वैशाली तावरे, समीरची बहीण माया तावरे व समीर हे एकत्र राहत होते. पतीच्या निधनानंतर तिची बहीण समीरकडे राहत होती. दरम्यान, वैशाली आणि माया यांचा घरगुती वाद झाला. यामुळे बुधवारी माया रागाच्या भरात घरातून निघून गेली. गुरुवारी सकाळी मायाने विहिरीत आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर समीर आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला.
दरम्यान, या सर्व प्रकारानंतर पत्नीच्या छळाला कंटाळून आपल्या बहिणीने आत्महत्या केल्याचे समजताच समीरचा राग अनावर झाला. यानंतर त्याने घरी पोहोचून पत्नीच्या गळ्यात कुऱ्हाडीने वार करून खून केला. यानंतर त्यांनी घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना दौंड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
बहिणीने आत्महत्या केली म्हणून पत्नीचा खून
Reviewed by ANN news network
on
११/२०/२०२१ ०९:२१:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: