Police e news

किरीट सोमय्यांच्या निषेधार्थ शिवसैनिक रस्त्यावर! पोंलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिकातील संघर्ष टळला

पिंपरी : भारतीय जनता पक्षाचे नेता, माजी खासदार किरीट सोमय्या रविवारी पिंपरी चिंचवड शहराच्या दौ-यावर आले असताना पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणेही त्यांची बाहेर काढावी म्हणून त्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालय असलेल्या इमारतीच्या प्रवेशद्वारावरच रोखल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत प्रवेशद्वार बंद केले. त्यामुळे शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात परस्परविरोधी घोषणाबाजी झाली. काळे झेंडे दाखवून सोमय्यांचा निषेध शिवसैनिकांनी केला. सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना टीकेचे लक्ष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्यावरही थेट टीका केली. मात्र, त्यामुळे पूर्वाश्रमी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेल्या आणि आता भारतीय जनता पक्षात असलेल्या अनेकांची पंचाईत झाली. त्याचा तणाव त्यांच्या चेह-यांवर स्पष्ट दिसत होता. तर, काहींना वारंवार घाम पुसण्याची पाळी येत होती. अलिकडेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पोलीस कोठडीत ठेवलेल्या प्रत्येक दिवसाचा हिशेब द्यावा लागेल असा थेट इशारा भाजपला दिला होता. त्यावर सोमय्या यांनी भाष्य करत पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले अलिकडेच पवारसाहेबांनी अनिल देशमुख यांना पोलीस कोठडीत ठेवलेल्या प्रत्येक दिवसाचा हिशेब द्यावा लागेल अशी धमकी दिली आहे. परंतु त्यांना देशमुखांवर एव्हढे प्रेम का उफ़ाळून आले आहे?, त्यांना देशमुखांना वाचवायचे आहे की त्यांना अजित पवार यांची काळजी आहे? त्यांच्या आतापर्यंत बाहेर आलेल्या बेहिशेबी संपत्तीचा आजचा आकडा १ हजार ५० कोटी रुपये असला तरी, प्रत्याक्षात तो चार हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. आमच्याकडे पण या संदर्भात काही कागदपत्रे आली होती ती आम्ही संबंधित खात्याकडे सुपूर्द केली आहेत. याशिवाय त्यांनी अर्जुन शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्यातील कथित गैरव्यवहार प्रसार माध्यमांसमोर मांडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली.
किरीट सोमय्यांच्या निषेधार्थ शिवसैनिक रस्त्यावर! पोंलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिकातील संघर्ष टळला किरीट सोमय्यांच्या निषेधार्थ शिवसैनिक रस्त्यावर! पोंलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिकातील संघर्ष टळला Reviewed by ANN news network on ११/२१/२०२१ ०५:१९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.