Police e news

पुणे सोलापूर महामार्गावर बसच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जखमी

इंदापूर : ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे टायर फुटल्याने तो बदलत असताना मागून येणाऱ्या खासगी बस चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत युवक कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांचा मुलगा आहे. हा अपघात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील गागरगाव हद्दीत गुरुवारी (दि.18) रात्री साडेअकरा वाजता झाला. गुरुवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान ऊसाने भरलेला ट्रॅक्टर (एमएच 42 क्यू 4122) पुणे बाजूकडून सोलापूरच्या दिशेने जात होता. त्यावेळी पुढील ट्रॉलीचा टायर फुटला. हा टायर बदलत असताना पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बस (एमएन 01 बी 1440) वरील चालकाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने बसची ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीला पाठीमागून जोरात धडक बसली. या अपघातात विश्वास देवकाते आणि संतोष पवार हे तिघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस मदत केंद्राचे सहायक फौजदार भागवत शिंदे पोलीस हवालदार उमेश लोणकर व पोलीस नाईक नितीन जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना आदित्य देवकाते याचा मृत्यू झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात आदित्य विश्वास देवकाते (वय-18) याचा मृत्यू झाला. तर विश्वास रंगनाथ देवकाते (वय-45) आणि संतोष अंकुश पवार (रा. मदनवाडी, ता. इंदापूर) हे जखमी झाले आहे. आदित्य देवकाते हा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे नुतन संचालक विश्वास देवकाते यांचा मुलगा होता.
पुणे सोलापूर महामार्गावर बसच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जखमी पुणे सोलापूर महामार्गावर बसच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जखमी Reviewed by ANN news network on ११/२०/२०२१ ०९:०९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.