Police e news

अजित पवारांच्या आदेशानंतर पोलीस सतर्क

बारामती : येथील उपविभागातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात गणेश इंगळे यांना अवैध धंदे नष्ट करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यानंतर आता पोलीस कारवाईत आले आहेत. इंगळे यांनी पथकाच्या मदतीने अवैध धंद्याचा शोध सुरू केला. शहर परिसरात दोन ठिकाणी अवैध हातभट्टी व त्यात वापरले जाणारे रसायन पोलिसांनी पकडले. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे, तर दोन जण संधीचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. याप्रकरणी हनुमंत बबन लाड (वय ४३, रा. नि-बांदलवाडी, ता. बारामती) व मंगेश बबन लोंढे (नि-सुहासनगर आमराई) यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढेही अशा लोकांच्या कुटुंबीयांवर कारवाई करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. गणेश इंगळे यांनी ही माहिती दिली. बारामती, इंदापूर तालुक्यात अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुनरावृत्ती करणाऱ्यांवर झोपत्ती दादा कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर पोलिसांनी कारवाईची व्याप्ती वाढवली आहे. तसेच अवैध दारू विक्रेत्यांना दारू पुरवठा करणाऱ्या वाईन शॉप आणि बारमालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांत 214 गुन्हे दाखल करून 24 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
अजित पवारांच्या आदेशानंतर पोलीस सतर्क अजित पवारांच्या आदेशानंतर पोलीस सतर्क Reviewed by ANN news network on ११/२०/२०२१ ०९:१६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.