पिंपरी : निघोजे येथे एका लॉजवर वेश्या व्यवसाय चालविणाèया तिघांना चाकण पोलिसांनी शनिवारी दुपारी अटक केली.यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. निघोजे येथील हॉटेल आर्यन लॉजिंग अँड बोर्डिंग येथे ही कारवाई करण्यात आली. तिन्ही आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा, भारतीय दंड विधान कलम ३७० (३), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विष्णू भगवान झांझे (वय ३७, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), योगेश गोवर्धन वारे (वय २६, रा. निघोजे, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांच्या महिला (वय ३०) साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दोन महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होते. महिलांना आरोपींनी पैशांचे अमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी बाध्य केले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून आरोपी विष्णू आणि योगेश यांच्याकडून पोलिसांनी ३३ हजार ८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वेश्या व्यवसाय करून घेणा-या तिघांना अटक
Reviewed by ANN news network
on
११/२८/२०२१ ०८:४९:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: