प्रातिनिधिक चित्र
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील किवळे येथे असलेल्या द्वारका लॉजिंग अॅण्ड बोर्डिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यामुळे सोमवारी पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने तेथे छापा घातला. यावेळी दहा महिलांची सुटका करण्यात आली.
मुंबई बंगलोर महामार्गावरील किवळे – देहूरोड येथील द्वारका लॉजिंग अॅण्ड बोर्डिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (दि. ६) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या लॉजवर छापा घातला. यावेळी एक परदेशी, सहा इतर राज्यातील आणि तीन राज्यातील अशा एकूण १० पीडित महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली.
यावेळी पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ११ हजार ४०० रुपये रोख रक्कम, १४ हजार रुपयांचे दोन मोबाइल, ३०० रुपये किमतीचे इतर साहित्य, असा एकूण २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गवी रंगा कृष्णा गोवडा (वय ३८ रा. द्वारका लॉजिंग अॅण्ड बोर्डिंग, किवळे – देहरोड), लॉजचा मॅनेजर रामसुख अयोध्याप्रसाद पटेल (रा. गांवदेवी रोड, बोईसर, मुंबई) यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच लॉजचा मालक प्रताप शेट्टी (वय ४०, रा. कात्रज, पुणे) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस स्टेशन करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: