Police e news

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप

पिंपरी :  पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्यासह अन्य तीन कर्मचारी मंगळवारी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांना पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते समारंभपूर्वक निरोप देण्यात आला.

यावेळी कार्यक्रमात बोलताना पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, कृष्णप्रकाश  'तुम्ही निवृत्त झाले नाहीत समाजामध्ये व पोलीस दलासाठी तुम्ही नेहमी पोलीसच राहणार आहात. पोलीस दलात येऊन कर्तव्य बजावणे ही एक अभिमानाचीच बाब आहे. पोलीस आयुक्तालयात केव्हाही आपले स्वागतच असेल, कोरोना संसर्गाच्या कठीण काळात समाजासाठी आपण दिलेले मोलाचे योगदान नक्कीच कौतुकास्पद आहे.' असे बोलून सर्वांचे कौतुक  करुन पुढील वाटचालीस व भावी आयुष्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.

पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास पोलीस आयुक्त  कृष्णप्रकाश यांच्यासह  अपर पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे, पोलीस आयुक्तालयाच्या जनसंपर्क कार्यालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते.

श्रीधर  जाधव, सहायक पोलीस आयुक्त, विभाग पिंपरी-चिंचवड,  सोमनाथ  अडसुळ प्रमुख लिपीक, आस्थापना शाखा, दिलीप  गायकवाड सहा पोलीस फौजदार तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन, रियाज  पटेल सहा पोलीस फौजदार, पिंपरी पोलीस स्टेशन हे आज निवृत्त झाले आहेत.

 श्रीधर पांडुरंग जाधव, सहायक पोलीस आयुक्त, वाकड विभाग है सन १९८८ साली महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले असून त्यांनी दाभोळकर हत्याकांड, पानसरे हत्याकांड तपास व फरासखाना पोलीस ठाणे येथे झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या गुन्ह्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. तसेच एकूण ३४ वर्ष सेवेच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये त्यांना ३०० हून अधिक बक्षिसे मिळाली आहे तसेच त्यांना मा. पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह देखील मिळाले आहे. 

 सोमनाथ रघुनाथ अडसुळ प्रमुख लिपीक आस्थापना शाखा, पिंपरी-चिंचवड है सन १९९० साली पोलीस दलात लिपीक पदावर भरती झाले असून त्यांना आपले ३१ वर्षांचे संपूर्ण सेवा काळात पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज दौड, पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहर पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा तसेच मोटार परिवहन विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड येथे उत्कृष्ठ कर्तव्य बजावले बदल वरिष्ठांकडून एकूण ५८ बक्षिसे व १६ प्रशस्तीप्रत्रके मिळाली आहेत. 

 दिलीप जनार्दन गायकवाड सहा पोलीस फौजदार नेमणूक, तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन पिंपरी-चिचवड हे सन १९८३ साली पोलीस दलात भरती झाले असून त्यांचे ३८ वर्षाचे संपूर्ण सेवा काळात पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवड येथे उत्कृष्ठ कर्तव्य बजावले बदल वरिष्ठांकडून एकूण ३५ बक्षिसे मिळाली आहेत. 

 रियाज अहमद आदम पटेल सहा पोलीस फौजदार नेम-पिंपरी पो.स्टे. पिंपरी-चिचवड हे सन १९८५ साली पोलीस दलात भरती झाले असून त्यांचे ३६ वर्षाच संपूर्ण सेवा काळात पुणे शहर व पिंपरी चिंचवड येथे उत्कृष्ठ कर्तव्य बजावले बदल वरिष्ठांकडून एकूण ५० बक्षिसे मिळाली आहेत.


पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप Reviewed by ANN news network on ११/३०/२०२१ ०७:१५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.