लोणावळा : नववर्षाच्या स्वागतासाठी मावळ आणि लोणावळा परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत. त्यामुळे, परिसरात बेकायदा दारू विक्रीचे प्रमाणही वाढले आहे. रविवारी लोणावळा ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी कार्ला, बेहेरगाव, औढे येथे तीन ठिकाणी छापे घातले. त्यामध्ये 11 हजार 95 रुपयांची देशी आणि देशी बनावटीची विदेशी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
नंदू पाडुरंग हुलावळे, संतोष शिळावणे व वैभव चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून संत्रे देशी दारूच्या 54 बाटल्या मॅकडोवेल या देशी बनावटीच्या विदेशी दारूच्या 27 बाटल्या माणिक इथं 14 बाटल्या असा एकूण 11 हजार 95 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा राजेंद्र पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रविण मोरे, सहा पोलिस निरीक्षक निलेश माने, पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, सहायक फौजदार बोकड, पोलीस हवालदार शकील शेख, अमित ठोसर, पोलीस नाईक गणेश होळकर, शरद जाधवर, भूषण कदम, किशोर पवार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद गवळी, सिद्धेश्वर शिंदे, रईस मुलाणी, अरुण पवार यांनी केली आहे.
अशा प्रकारे कोणी अवैध दारुविक्री करीत असल्यास किंवा त्याबाबत काही माहीत असल्यास नागरिकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दूरध्वनी क्रमांक 02114273036 वर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी केले आहे.
बेकायदा दारु विक्री करणाऱ्यांवर लोणावळा ग्रामीण पोलीसांची कारवाई
Reviewed by ANN news network
on
१२/२६/२०२१ ०९:५८:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१२/२६/२०२१ ०९:५८:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: