पिंपरी : काटेपुरम चौक,पिंपळे गुरव येथे १८ डिसेंबर रोजी योगेश जगताप या तरुणाचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणातील फरारी आरोपींना कोये, तालुका चाकण येथे ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पथकावर या आरोपींनी गोळीबार केला रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. योगेश जगताप खून या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली होती. मात्र याप्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मोटे, महेश माने आणि अश्विन चव्हाण फरार होते. या तिघांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण पोलीस आयुक्तालय कामाला लागले होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी सांगवी पोलिसांची तीन पथके, गुंडास्क्वॉड आणि गुन्हे शाखा युनिट चार तपास करत होती. रविवारी रात्री आरोपी चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोये, कुरंकुडी ता. खेड येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर तपास पथकाथील अधिकारी यांचे चार पथके कोये याठिकाणी रवाना झाली. कोये गावात आरोपींचा शोध घेत असताना एका शेताच्या कडेला असलेल्या घराच्या बाजूस आरोपींची काळ्या रंगाची नंबर प्लेट नसलेली पल्सर गाडी दिसून आली. आरोपींचा परिसरात शोध घेत असताना आरोपींना पोलिसांची चाहूल लागली. आरोपीं ज्या घरात लपून बसले होते तेथून पळून जात असताना दोघांनी पोलीस पथकावर गोळीबार केला. दुसèया बाजूने येणाèया दुसèया पथकावर आरोपींनी पुन्हा गोळीबार केला. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, सतिश कांबळे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला. आरोपी झुडपात पळून जात असताना पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी त्याठिकाणी पडलेले झाड आरोपींच्या अंगावर टाकले. आरोपी खाली पडताच पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. गणेश हनुमंत मोटे (वय-२३ रा. कवडेनगर, लाईन नं.३ सांगवी), महेश तुकाराम माने (वय-२३ रा. कवडेनगर, सांगवी मुळ रा. पाटसांगवी, ता. भूम जि. उस्मानाबाद), अश्विन आनंदराव चव्हाण (वय-२१ रा. काटेपुरम चौक विनायकनगर नवी सांगवी मूळ रा. श्रीपत पिंपरी, ता. बार्शी जि. सोलापूर) अशीे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस नाईक मोरे, गेंगजे, नरळे, चौधरी, मुळुक, पाटील, गायकवाड, सुर्यवंशी, बाबा, तेलेवार कदम यांच्या पथकाने केली.
योगेश जगताप खून प्रकरणातील फरारी आरोपींचा पोलिसांवर गोळीबार
Reviewed by ANN news network
on
१२/२७/२०२१ ०९:०९:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: