Police e news

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव करसंकलन कार्यालयातील दोघा लिपिकांना लाच घेताना अटक

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव करसंकलन कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने शुक्रवारी छापा घातला असून तेथील दोन लिपिकांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे. प्रदीप शांताराम कोठावदे वय 39 आणि हैबती विठ्ठल मोरे वय 51 अशी या दोघांची नावे आहेत. रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे दिली होती. या तक्रारदाराकडून मिळकत हस्तांतरण आणि करपावतीमध्ये झालेल्या चुकीच्या नावाची दुरुस्ती करण्यासाठी या दोघांनी साडेआठ हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी पडताळणी करून सापळा रचला. शुक्रवारी दिनांक 17 रोजी तक्रारदार प्रदीप कोठावदे याला भेटले असता त्याने साडेपाच हजार रुपयांची मागणी केली व हैबती मोरे याने तीन हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी ही रक्कम दिल्यानंतर ती स्वीकारताना या दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. याबाबतचा गुन्हा वाकड पोलीस स्टेशन येथे नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार करत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव करसंकलन कार्यालयातील दोघा लिपिकांना लाच घेताना अटक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव करसंकलन कार्यालयातील दोघा लिपिकांना लाच घेताना अटक Reviewed by ANN news network on १२/१७/२०२१ १०:०७:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.