Police e news

सरकारी नोकरी लावण्याचे अमिष दाखवून तरुणीची आठ लाखांची‌ फसवणूक




लोणावळा : सरकारी नोकरी लावण्याच्या आमिषाने एक तरुणीची आठ लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमकार सुनिल भावे (रा. कुसगाव ता. मावळ, जि . पुणे) आणि रचना सुर्वे उर्फ पूर्वा (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) असे या आरोपींची नावं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार वर्षा शांतेश्वर कदम (वय २९ वर्ष, सध्या रा. कुरवंडे, ता. मावळ, पुणे, मुळ रा. लोहारा, जि. उस्मानाबाद) यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे. वर्षा कदम या लोणावळा येथील आयएनएस शिवाजी या संस्थेचे कॅन्टीन चालवतात. तर ओमकार भावे हा आयएनएस शिवाजी या केंद्रिय संस्थेत क्लर्क या हुद्द्यावर काम करत होता. कॅन्टीनमध्ये चहा पिण्यासाठी ये जा असल्याने कदम व भावे यांची ओळख झाली. या ओळखीतुनच भावे याने रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वर्षा कदम यांच्याकडे अठरा लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र वर्षा कदम यांच्याकडुन एवढी रक्कम मिळणार नाही हे लक्षात आल्याने भावे याने आठ लाख रुपयात नोकरी लावण्याचे आश्वासन देत वर्षा कदम यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले होते. 

पैसे देऊनही काम होत नसल्याने, वर्षा कदम यांनी ओमकार भावे याच्या मागे कामाचा तगादा लावला होता. या तगाद्याला कंटाळुन ओमकार भावे याने वर्षा कदम यांना नोकरीवर हजर होण्याबाबतचे बनावट नियुक्ती पत्र, सरकारी ड्रेस व कपडेही आणून दिले होते. मात्र वर्षा कदम यांना संशय आल्याने त्यांनी लोणावळा शहर पोलिसात धाव घेतली व ओमकार भावे याच्या विरोधात तक्रार दिली. तर दुसरीकडे ओमकार भावे हा सरकारी शिक्के व लेटरहेडचा वापर करुन लोकांची फसवणुक करत असल्याचा संशय नौसेना पोलिसांना आल्याने, त्यांनीही लोणावळा पोलिसांना याबाबत सतर्क केले होते. 

गुन्ह्यातील आरोपी ओमकार भावे आणि रचना सुर्वे उर्फ पूर्वा हे दोघेही अद्यापी फरार असून लोणावळा शहर पोलीस त्यांचा शोध घेत आहे. म.पो.उप.नि. सुरेखा शिंदे या सदर घटनेचा पुढील तपास करीत आहे.
सरकारी नोकरी लावण्याचे अमिष दाखवून तरुणीची आठ लाखांची‌ फसवणूक  सरकारी नोकरी लावण्याचे अमिष दाखवून तरुणीची आठ लाखांची‌ फसवणूक Reviewed by ANN news network on १०/१३/२०२२ ०८:१८:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.