पिंपरी : चिंचवडगावातील मधील भाजपचे नेते गजानन चिंचवडे यांच्या मृत्यूप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजानन चिंचवडे यांच्या पत्नी नगरसेविका अश्विनी चिंचवडे (वय 45) यांनी शनिवारी या बाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शकुंतला बाळू चिंचवडे, दिनेश बाळू चिंचवडे, राजेश बाळू चिंचवडे, महेश उर्फ सुनील बाळू चिंचवडे, ओंकार महेश चिंचवडे, संकेत दिनेश चिंचवडे, तीन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन चिंचवडे यांचा शनिवारी दुपारी एकच्या पूर्वी मृत्यू झाला. आरोपींनीचिंचवडे यांच्या विरोधात 25 जानेवारी रोजी फसवणुकीचा खोटा गुन्हा दाखल केला. त्याची न्यूज पेपर, न्यूज चॅनलला बातमी देऊन चिंचवडे यांची बदनामी करत त्यांना मानसिक त्रास दिला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 306, 34 नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजानन चिंचवडे यांच्या मृत्यू प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल
Reviewed by ANN news network
on
२/०६/२०२२ ०८:५८:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: