पिंपरी : पिंपरी चिंचवडचे पोलीसआयुक्त कृष्णप्रकाश मित्र आहेत. मी अहमदाबादचा पोलिसआयुक्त आहे. माझ्या मोबाईल क्रमांकावर पैसे पाठव; अशी मागणी एका अज्ञात भामट्याने पोलीस निरिक्षकाकडे केल्याचा प्रकार घडला आहे.
या प्रकरणी पोलीस निरिक्षक देवेंद्र चव्हाण यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार, खान (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 8 ते 28 डिसेंबर रोजी चिंचवड येथे घडला आहे.
फिर्यादी चव्हाण आणि अन्य पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल क्रमांकावर पेटीएम, गुगलपेद्वारे आत्तापर्यंत 24 हजार रुपये पाठवले आहेत. मात्र, त्याच्या बोलण्याचा संशय आल्याने फिर्यादी चव्हाण यांनी पैसे देण्यास नकार देऊन नोंदवला आहे. या ठकसेनाने अनेक पोलिसांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
पोलीस आयुक्त मित्र असल्याचे सांगत पोलीस निरीक्षकाकडून पैशांची मागणी
Reviewed by ANN news network
on
१२/२९/२०२१ ०९:२९:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: