Police e news

सोमाटणे फाटा येथील हॉटेलमधून रेशनचा धान्यसाठा जप्त

पिंपरी : गणपती मळा, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे येथील रुद्राक्ष चायनीज अॅ ण्ड रेस्टॉरंटवर सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास पोलिसांनी छापा घालून रास्तदराच्या धान्यदुकानात विक्रीसाठी असलेला धान्यसाठा जप्त केला आहे. गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली. जप्त धान्यासाठ्याची किंमत सुमारे 23 लाख रुपये आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांना रुद्राक्ष चायनीज अॅुण्ड रेस्टॉरंट, गणपती मळा, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे येथे बेकायदेशीरपणे रेशनच्या धान्याचा साठा करून ठेवला आहे.स्वरुप हनुमंत पाटणकर (वय 38, रा. माळेगाव पुणे) हा शासकीय रेशनचे गहू व तांदूळ अनाधिकृतपणे विक्री करुन नफा कमवत आहे. त्यासाठी त्याने रेशनच्या मालाचा साठा करून ठेवला आहे अशी माहिती मिळाली. दरोडा विरोधी पथकाने सोमवारी रात्री सातच्या सुमारास छापा घातला. पाटणकर याच्या ताब्यातून प्रत्येकी 50 किलो वजनाच्या तांदळाच्या 680 गोणी आणि गव्हाच्या 640 गोणी, तसेच एक शिलाई मशीन, आठ रीळ धागा असा एकूण 23 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाईसाठी आरोपीला तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर कैलासे, पोलीस अंमलदार नितीन लोखंडे, गणेश हिंगे, सागर शेडगे, सुमित देवकर, खंडणी विरोधी पथकातील निशांत काळे, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने केली आहे.
सोमाटणे फाटा येथील हॉटेलमधून रेशनचा धान्यसाठा जप्त सोमाटणे फाटा येथील हॉटेलमधून रेशनचा धान्यसाठा जप्त Reviewed by ANN news network on १२/२९/२०२१ ०९:३१:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.