पिंपरी : नखातेवस्ती, रहाटणी येथील एका व्यक्तीला व्हॉट्सअॅप चॅट्स आणि एसएमएस सार्वजनिक करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणा-या एका महिलेला खंडणी स्वीकारताना पोलिसांनी शिवारचौक, रहाटणी येथे अटक केली.
सविता अभिमान सूर्यवंशी (वय ३८, रा. ताडीवाला रोड झोपडपट्टी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सखाराम नारायण नखाते (वय ५४, रा. नखातेवस्ती, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सविता हिने फिर्यादी नखाते यांना त्यांच्यात झालेले व्हॉट्सअॅप चॅट्स आणि एसएमएस आपल्याकडे असल्याचे सांगितले. ते मेसेजेस फिर्यादी यांच्या घरी, त्यांच्या सोसायटीतील लोकांना दाखवून समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. मुलींना फसवतो, अशी सोशल मीडियावर बदनामी करेन, असेही सविता हिने धमकावले. या शिवाय, स्वतः आत्महत्या करून गुन्ह्यामध्ये गुंतविन, अशी धमकी देत प्रकरण मिटविण्यासाठी नखाते यांच्याकडे तिने २० लाख रुपये खंडणीची मागणी केली. नखाते यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शिवारचौक, रहाटणी येथे २० लाख रुपयांपैकी १२ लाखांची खंडणी स्वीकारताना सविता हिला अटक केली.
खंडणी उकळणा-या महिलेस अटक
Reviewed by ANN news network
on
१२/३१/२०२१ ०९:२७:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: