लोणावळा : विनापरवाना आणि बेकायदेशीर रित्या दारू विक्री करण्यासाठी जात असलेल्या एका युवकाला लोणावळा शहर पोलिसांनी मुद्देमालासह अटक करीत कारवाई केली आहे. संबंधित युवकाकडून पोलिसांनी 10500 रुपयांची दारू आणि एक दुचाकी असा एकूण 60500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शेरा रामप्रकाश गुर्जर (वय 22वर्षे, रा. जयमातादी हॉटेल, वरसोली, मुळ रा. फिरोजाबाद उत्तरप्रदेश) हा त्याच्याकडील ऍक्टिव्हा (ॠग 01 णइ 5727) या दुचाकीवरून एका पांढर्या बॉक्स मधून ब्लेंडर प्राईड या कंपनीच्या प्रत्येकी 2 लिटर मापाच्या 3 दारूच्या बाटल्या घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर त्याला अटक करण्यात आली. आरोपीवर मु. प्रो. अॅाक्ट क.65 (ई)(अ) प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन मटका खेळणार्या् चार लोकांवर लोणावळा पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईच्या अनुषंगाने यापुढे शहरात कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर अवैध धंदे करू दिले जाणार नसल्याचा संदेश नवनियुक्त पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी दिला आहे.
दुकानातून विनापरवाना दारू घेऊन जाणार्यां वर होणार कारवाई
लोणावळा शहरात पर्यटनासाठी येणारे अनेक पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी बंगले भाड्याने घेऊन राहतात आणि त्याचठिकानी मौजमस्ती करतात. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देखील अनेक पर्यटक लोणावळ्यात येणार आहेत. त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन जरूर मौजमस्ती करावी, त्याला विरोध नाही. मात्र मौजमस्तीच्या नावाखाली दारू पिउन नशा करून इतरांना त्रास होईल अशी दंगामस्ती करणार्यांोवर मात्र पोलिस सक्त कारवाई करणार असून रस्त्यावरून खुलेआम विनापरवाना दारू घेऊन जाणार्याहवर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी दिला आहे.
बेकायदेशीर दारू विक्री करणारा युवकाला लोणावळा पोलिसांकडून अटक
Reviewed by ANN news network
on
१२/२९/२०२१ ०९:३४:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: