Police e news

सेना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरातून चंदनाची चोरी

पिंपरी : सेना अभियांत्रिकी महाविद्यालय, दापोडी येथून ३० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत सुमारे ६० चंदनाची झाडे चोरीला गेली असून या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अशोक उर्फ वाकड्या भरमासाब काळे (वय ५५, रा. दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या तीन ते चार साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निशांत सह्देवन कॅरिव्हिटल (वय ३६, रा. सीएमई, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक आणि त्याच्या साथीदारांनी मिळून सेना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरातून दीड लाख रुपये किमतीची सुमारे ५० ते ६० चंदनाची झाडे आणि रोपे चोरून नेली. ३० डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता झाडे चोरताना अशोक याला पकडण्यात आले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सेना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरातून चंदनाची चोरी सेना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरातून चंदनाची चोरी Reviewed by ANN news network on १२/३१/२०२१ ०९:३१:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.