Police e news

तोतया पोलीस आयुक्त अटकेत

पिंपरी : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश मित्र असल्याचे भासवून स्वत: अहमदाबादचा पोलीस आयुक्त असल्याचे सांगत पोलिसांकडून पैसे उकळणा-या तोतया पोलीस आयुक्ताला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. खलीउल्लाहा अयानुल्लाह खान (वय ४२, रा. जोगेश्वरी, मुंबई), असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे. सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी या बाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने ८ ते २८ डिसेंबर या कालावधीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पोलीस नियंत्रण कक्षात वारंवार फोन केला. मी अहमदाबाद पोलीस आयुक्त विजयसिंगबोलतोय, आपल्यांपोलीस आयुक्तांचा फोन नंबर द्या, असा कॉल आरोपीने केला. त्यानुसार पोलीस आयुक्तांचा फोन नंबर देण्यात आला. त्यानंतर आरोपीने पुन्हा कॉल केला. तुमचे पोलीस आयुक्त यांना मी वारंवार फोन करतो, परंतू ते माझा फोन उचलत नाहीत. पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैधपणे मोठ्या प्रमाणातपिस्तुलांची विक्री करणा-या इसमांवर कारवाई करण्यासाठी माहिती द्यायची आहे. तुमच्या गुन्हे शाखेच्या अधिका-यांचे फोन नंबर मला द्या, असे आरोपीने सांगितले. त्यानुसार त्याला अधिका-यांचे नंबर देण्यात आले. त्यानंतर पुन्हा आरोपीने फोन केला. मी पोलीस आयुक्तांना २५ वेळा फोन केला. परंतू ते फोन उचलत नाहीत, असे आरोपी म्हणाला. मी गुप्त खब-या बोलतोय, तुमच्या हद्दीमध्ये पिस्तुलांची अवैध विक्री होणार आहे, असे सांगून त्याने पोलीस उपनिरीक्षकाच्या व्हॉट्सअपवर पिस्तूल विक्री करणा-या व्यक्तीचे फोटो, गाडीचा फोटो व पिस्तुलाचे फोटो पाठविले आणि पैशांची मागणी केली. त्याचा संशय आल्याने पोलिसांनी तपास केला असता आरोपी गोरेगांव, मुंबई येथे असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले. आरोपीचा विश्वास संपादन करण्यासाठी २४ हजार रुपये त्याच्या पेटीएम व गुगलपेवर पाठविण्यात आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले. त्याने यापूर्वी ब-याच पोलीस अधिका-यांना फोन करून अशाच प्रकारे फसवणूक केली असल्याचे चौकशीत समोर आले. त्याच्या विरुद्ध मुंबई येथील मालाड, गोरेगाव, ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत.
तोतया पोलीस आयुक्त अटकेत तोतया पोलीस आयुक्त अटकेत Reviewed by ANN news network on १२/३१/२०२१ ०९:३३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.