Police e news

हॉटेलमधील कामगारांना मारहाण

तळेगाव दाभाडे : कुसगाव येथील एम्ररिस हॉटेलमध्ये काम करणा-या आठ कामगारांना शनिवारी रात्री ९ वाजता दोघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी मिलिंद रमेश कांबळे (वय ३२, रा. भोसरी) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यावरून प्रज्वल शांताराम कदम, रंजित विजय केदारी (दोघे रा. कुसगाव, ता. मावळ) यांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी हे कुसगाव येथील एम्ररिस हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतात. आरोपींनी हॉटेलच्या स्टाफ रूमचा दरवाजा तोडला. हॉटेलच्या स्टाफला मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादी घाबरून विजय अडसूळ यांच्याकडे गेले आणि या प्रकाराबद्दल त्यांना सांगितले. फिर्यादी आणि विजय अडसूळ स्टाफ रूमकडे आले असता आरोपी स्टाफरूम मध्ये झोपलेल्या आठ कामगारांना लाकडी दांडक्याने मारहाण करीत होते. फिर्यादी आणि विजय अडसूळ आल्याचे पाहून आरोपी पळून गेले. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
हॉटेलमधील कामगारांना मारहाण हॉटेलमधील कामगारांना मारहाण Reviewed by ANN news network on १/०५/२०२२ ०८:३८:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.