वाकड : काळेवाडी फाटा, वाकड येथील एका ज्येष्ठ नागरिकाला त्याचे बँक खाते आणि डेबिट कार्ड ब्लॉक होणार असल्याचे भासवून त्याची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना २८ डिसेंबर रोजी घडली असून यामध्ये त्या ज्येष्ठ नागरिकाला २ लाख २४ हजार ७९९ रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. गिरीवलकुमार रघुनाथ प्रसाद सोडानी (वय ६७, रा. काळेवाडी फाटा, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ८१००६९९२९२ आणि ७६०४०७९१४६ या मोबाईल क्रमांकधारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोडानी यांना ७६०४०७९१४६ या क्रमांकावरून एक मेसेज आला. त्यामध्ये फिर्यादी यांचे एसबीआय बँकेचे योनो अकाउंट व डेबिट कार्ड ब्लॉक होणार आहे, ते पॅन कार्डनंबरने अपडेट करून घ्या, असे सांगण्यात आले. फिर्यादी यांनी त्या मेसेज मधील लिंकवर क्लिक केली आणि पूर्ण माहिती भरली. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडून गोपनीय माहिती घेण्यात आली. त्याआधारे फिर्यादी यांच्या बँक खात्यातून तीन टप्प्यांमध्ये एकूण२न लाख २४ हजार ७९९ रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली.
ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन फसवणूक
Reviewed by ANN news network
on
१/०५/२०२२ ०८:५०:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: