Police e news

चिंचवड येथे तरुणाचा खून

चिंचवड : चिंचवडेनगर, चिंचवड येथे मंगळवारी रात्री दारू पिताना झालेल्या वादातून एका सराईत गुन्हेगाराने एका तरुणाचा खून केला. अमर व्यंकट पवार (वय २७) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिजित व्यंकट पवार (वय २२, रा. सायली कॉम्प्लेक्स रोड, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमित लगस व त्याचे दोन ते तीन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्राचा वाढदिवस असल्याने मयत अभिजित, आरोपी अमित लगस आणि इतर मित्र पार्टी करण्यासाठी चिंचवडेनगर, चिंचवड येथील रानमळा हॉटेलच्या पाठीमागे बसले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. या वादातून आरोपी लगस याने अभिजित यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली तसेच गळ्यावर वार केले.
चिंचवड येथे तरुणाचा खून चिंचवड येथे तरुणाचा खून Reviewed by ANN news network on १/०५/२०२२ ०८:५३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.