पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून सुरक्षेचा उपाय म्हणून पिंपरी चिंचवड पोलीसदलातील ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंडांची समस्या यासारखे आजार असणा-या पोलिसांना घरून काम करण्यास मुभा देण्याचा विचार उच्च प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.
पिंपरी चिचंवड पोलीस आयुक्तालयातील असे सुमारे ४०३ कर्मचारी असल्याचे समजते. पिंपरी चिंचवडमध्ये सध्या ३ हजार २७५ कर्मचारी आहेत. त्यातील ३०५ सहायक फौजदार तर ५५ हवालदार आहेत. वरिष्ठ पातळीवरून सूचना आल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त प्रभाकर घनवट यांनी दिली आहे.
५५ च्या पुढील पोलीस कर्मचा-यांना घरून काम करण्याची सुविधा दिल्यानंतर, अन्य पोलिसांवरील कामाचा ताण वाढणार आहे. तसेच या घरून काम करणा-या कर्मचा-यांना नेमके काय काम दिले जाणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये वयस्कर आणि व्याधीग्रस्त पोलिसांना घरून काम करण्याची मुभा देणार
Reviewed by ANN news network
on
१/०८/२०२२ ०९:०१:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: