Police e news

देहूरोड छावणी परिषद हदीत ५ चंदनाच्या झाडांची चोरी

देहूरोड : देहुरोड छावणी परिषद हद्दीतून पाच चंदनाच्या झाडांची चोरी झाली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.०७) उघडकीस आला. तर, दारुगोळा कारखान्यातील चंदनचोरीचा प्रयत्न रविवारी (दि.०२) उघडकीस आला. या दोन्ही प्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध शुक्रवारी (दि.०७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छावणी परिषद हद्दीतील चोरी प्रकरणात राहुल वसंत भोसले (वय ४५, रा. मामुर्डी, देहुरोड) यांनी तर, दारुगोळा कारखाना प्रकरणात निखिल देविदास दंडारे (वय ३१, रा. आयुध निर्माण वसाहत) यांनी फिर्याद दिली आहे.पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.दारुगोळा कारखाना येथे चोरीचा प्रयत्न झाला आहे. मात्र, झाडे चोरीस गेलेली नाहीत.
देहूरोड छावणी परिषद हदीत ५ चंदनाच्या झाडांची चोरी देहूरोड छावणी परिषद हदीत ५ चंदनाच्या झाडांची चोरी Reviewed by ANN news network on १/०८/२०२२ ०९:०३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.