Police e news

कुरिअर वाटप करणा-याची बॅग लांबवली

चिंचवड : चिंचवड येथे शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कुरिअर वाटप करणा-या तरुणाची बॅग अज्ञात चोराने लांबवली. याप्रकरणी किरण बाबुराव रिटे (वय २७, रा. निगडी, यमुनानगर मूळगाव अहमदनगर) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रिटे पार्सल वाटप करण्यासाठी दुर्गा लक्ष्मी बिल्डिंग, सीडीसी पूर्णानगर, चिंचवड येथे गेले असता त्यांनी इमारतीच्या पार्किंगमध्ये ठेवलेली कुरिअर बॅग अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. ३८ हजार ८०० रुपयांच्या या बॅगमध्ये ६० हजार रुपये किमतीचे पार्सलही होते.
कुरिअर वाटप करणा-याची बॅग लांबवली कुरिअर वाटप करणा-याची बॅग लांबवली  Reviewed by ANN news network on १/०८/२०२२ ०८:५९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.