Police e news

भोसरी येथील ’त्या’ महिलेच्या खुन्याला अटक!; गुंडविरोधी पथकाची चमकदार कामगिरी!!

भोसरी येथील ’त्या’ महिलेच्या खुन्याला अटक गुंडविरोधी पथकाची चमकदार कामगिरी पिंपरी : भोसरी येथे दिनांक 16 ऑगस्ट रोजी एका महिलेचा तिच्या दुकानात धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आला होता. या गुन्ह्याचा मोठ्या चिकाटीने तपास करून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंड विरोधी पथकाने आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ठाण्यातील कोळसेवाडी पोलीस स्थानकात तीन गुन्हे दाखल आहेत. पैशांसाठी त्याने या महिलेचा खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. लांडगे आळी, भोसरी येथील प्रगती कलेक्शन या दुकानात पूजा प्रसाद या 31 वर्षीय महिलेचा 16 ऑगस्ट रोजी धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आला होता. आरोपीने मागे कोणताही धागादोरा सोडलेला नसल्यामुळे या प्रकरणाचा तपास करणे अत्यंत अवघड होते. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी गुन्हे शाखेच्या सर्व पोलिसांना कामाला लावले. गुंडविरोधी पथकातील दोन वेगवेगळ्या टीम या प्रकरणाचा समांतर तपास करत होत्या. गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी भोसरी, चाकण परिसरातील सुमारे 250 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी त्यांनी केली. यानंतर सीसीटीव्ही फुटेज मधील व्यक्तीने रांजणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ब्युटीपार्लर चालवणार्‍या एका महिलेचा मोबाईल आणि दहा हजार रुपये चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रांजणगाव येथे जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर भोसरी येथील सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारा आणि रांजणगाव येथील सीसीटीव्ही मध्ये दिसणारा माणूस एकच असल्याची त्यांची खात्री झाली. पोलिसांनी कारेगाव परिसरामध्ये जाऊन त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. एका स्थानिक रहिवाशाने हा माणूस खंडोबा मंदिराच्या मागे उभा आहे अशी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता त्याने आपले नाव रामकिशन शंकर शिंदे (वय 24, रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे मूळ राहणार बाभूळगाव, जि. हिंगोली) असल्याचे सांगितले. भोसरी येथील महिलेच्या खुनाचीही कबुली त्याने दिली. पैशांसाठी हा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे ,अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर संजय शिंदे, उपायुक्त काकासाहेब डोळे, प्रशांत अमृतकर, सहाय्यक आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुंड विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एच.डी. माने, प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, गणेश मेदगे, विजय गंभीरे, सुनील चौधरी, मयुर दळवी, गेंगे नितीन गेंगजे, श्याम बाबा, विजय तेलेवार, रामदास मोहिते, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी, तौसिफ शेख यांनी ही कारवाई केली.
भोसरी येथील ’त्या’ महिलेच्या खुन्याला अटक!; गुंडविरोधी पथकाची चमकदार कामगिरी!! भोसरी येथील ’त्या’ महिलेच्या  खुन्याला  अटक!;  गुंडविरोधी पथकाची चमकदार कामगिरी!! Reviewed by ANN news network on ८/२६/२०२२ ०३:४१:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.