देहुगाव : देहुगाव येथील तलाठी आणि मंडलाधिकारी यांच्याशी संगनमत करून खोट्या बनावट कागदपत्रांच्या आधारे खोट्या वारसनोंदी महसूल दप्तरात करून घेणार्या एका 12 जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल झाला आहे.
दि. 14 मार्च 2019 रोजी हा प्रकार घडला असून या प्रकरणी महेश भिकाजी नलावडे (वय 42, रा. निगडी) याने शनिवारी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून प्रताप भबुतमल मारवाडी, विनोद भबुतमल मारवाडी, दोन महिला, तुषार दत्तात्रय झेंडे, महेंद्र साहेबराव झेंडे, तत्कालीन देहूगाव तलाठी, मंडल अधिकारी शेखर शिंदे, प्रमोद राजाराम शिंदे, देविदास लक्ष्मण पवळे, अतुल ज्ञानेश्वर थिटे, अमर वसंत कोंढारे यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम 420,465,467, 468,471,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्वांनी संगनमताने न्यायालयाचे बनावट शिक्के तयार केले. त्याआधारे खोटी वारस प्रमाणपत्रे तयार केली. स्वतःची वारस म्हणून नोंद करून घेत शासनाची फसवणूक केली.
--------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: