अल्पवयीन मुलीला त्रास देणार्यावर गुन्हा दाखल
देहुरोड : अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवरून सतत संदेश पाठवून त्रास देणार्यावर मंगळवारी देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्या मुलीच्या नातेवाईक स्त्रीने याबाबत तक्रार दिली आहे. त्यावरून सोनू (पूर्ण नाव माहिती नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या 13 वर्षाच्या पुतणीचा आरोपी शाळेत जाताना व घरी येताना पाठलाग करत असे. मंगळवारी त्याने पिडीतेच्या आजीच्या फोनवर इंस्टाग्राम अकाऊंटवरून संदेश पाठवला.त्यामुळे फिर्यादीने पोलिसांत तक्रार दिली.
अल्पवयीन मुलीला त्रास देणार्यावर गुन्हा दाखल
Reviewed by ANN news network
on
९/०३/२०२२ ०३:२२:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: