दीड लाख रुपयांचे दागिने लांबवले
रावेत : चंद्रभागा कॉर्नर, रावेत येथे रविवारी सायंकाळी पेस्ट कंट्रोलचे काम करण्यासाठी आलेल्या कामगाराने एका घरातून दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबवले.
बसवराज साहेबन्ना कोरे (वय 59, रा. चंद्रभागा कॉर्नर, रावेत) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्यंकटेश आडे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादींच्या घरी रविवारी सायंकाळी चार वाजता आरोपी पेस्ट कंट्रोलचे काम करण्यासाठी आला. त्याने घरातील लॉकर चावीच्या सहाय्याने उघडून 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे 44 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लांबवले.
दीड लाख रुपयांचे दागिने लांबवले
Reviewed by ANN news network
on
९/०३/२०२२ ०३:२४:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: