जीवन प्राधिकरणाच्या नलिका चोरणारे अटकेत
पिंपरी : वाघजाईनगर, खराबवाडी येथून जीवन प्राधिकरणाच्या मालकीचे लोखंडी पाईप चोरून नेणार्या चौघांना महाळुंगे पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांच्याकडून 10 लाख 35 हजारांचे पाईप जप्त केले आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग क्रमांक तीनचे शाखा अभियंता राजेश कुलकर्णी यांनी याबाबत महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
अमोल अर्जुन गोरे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड. मूळ रा. शेळगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), हनुमंता संगाप्पा कट्टीमणी (रा. बिजलीनगर, चिंचवड. मूळ रा. कर्नाटक), आतिश राजाभाऊ कांबळे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड. मूळ रा. घारगाव, ता. कळंब, जि. उस्मानाबाद), सुंदर दोदाप्पा दोड्डमणी (रा. बिजलीनगर, चिंचवड. मूळ रा. कर्नाटक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
खराबवाडी मधील वाघजाईनगर येथे हे पाईप पाण्याच्या टाकीजवळ ठेवण्यात आले होते. 8 ते 10 एप्रिल या कालावधीत अज्ञातांनी 13 लाख 50 हजारांचे 120 पाईप चोरून नेल्याचा प्रकार घडला. याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर महाळुंगे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून 10 लाख 35 हजारांचे 92 पाईप जप्त केले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, उपनिरीक्षक किरण शिंदे, पोलीस हवालदार राजू कोणकेरी, अमोल बोराटे, पोलीस नाईक संतोष काळे, युवराज बिराजदार, किशोर सांगळे, अमोल निघोट, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, शरद खैरे यांनी केली आहे.
-----
जीवन प्राधिकरणाच्या मालकीचे लोखंडी पाईप चोरणारे अटकेत
Reviewed by ANN news network
on
४/१७/२०२२ ०२:३५:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
४/१७/२०२२ ०२:३५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: