Police e news

कत्तलीसाठी जनावरे नेणारा टेम्पोचालक अटकेत

कत्तलीसाठी जनावरे नेणारा टेम्पोचालक अटकेत हिंजवडी : सुस खिंड येथे शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास कोंढवा येथे कत्तल करण्यासाठी एक गाय, एक बैल आणि एक वासरू टेम्पोमधून वाहून नेणार्‍या एकास हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार शंकर उत्तेकर यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून अटक केलेल्याचे नाव सुग्रीव रोहिदास शिंदे (वय 39 रा.हडपसर) असे आहे. आरोपी सुग्रीव शिंदे याने त्याच्या ताब्यातील टेम्पोतून वरील तीन जनावरांची कत्तल करण्यासाठी वाहतूक केली याबाबत माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी सूसखिंड येथे टेम्पो अडवला. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने ही तिन्ही जनावरे कत्तल करण्यासाठी कोंढवा येथे नेत असल्याची कबुली दिली.
कत्तलीसाठी जनावरे नेणारा टेम्पोचालक अटकेत कत्तलीसाठी जनावरे नेणारा टेम्पोचालक अटकेत Reviewed by ANN news network on ९/०५/२०२२ १०:३७:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.