Police e news

आर्थिक फसवणूक करणार्‍या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल

आर्थिक फसवणूक करणार्‍या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल हिंजवडी : हिंजवडी येथे नव्याने उभारल्या जात असलेल्या गृहप्रकल्पाच्या अ‍ॅल्युमिनियम विंडो आणि एस. एस. ग्लास रोलिंगचे काम करून घेऊन पैसे न देता काम करणार्‍या व्यावसायिकाची फसवणूक करणार्‍या दोघांवर हिंजवडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हरीश गुलाब वाघेरे (वय-34, रा. तपोवन मंदिर रस्ता, पिंपरी वाघेरे) याने रविवारी फिर्याद दिली आहे. त्यावरून किरण भूमकर, अमर भूमकर A(दोघे रा. भूमकरनगर, वाकड पुलाजवळ, पुणे) यांच्यावर भा.दं.वि. कलम 420, 406 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने हिंजवडीतील मॅग्नोवा रिअल्टी या प्रकल्पामध्ये अ‍ॅल्युमिनियम विंडो आणि एस. एस. ग्लास रोलिंगचे काम केले आहे.या कामाचे 50 लाख 33 हजार 908 रुपये बिल झाले. आरोपींनी त्यापैकी फिर्यादीला 37 लाख 55 हजार 500 रुपये डिसेंबर 2018 मध्ये दिले आहेत. उर्वरित 12 लाख 78 हजार 108 रुपये फिर्यादीने मागितले असता आरोपींनी फिर्यादीला प्रत्येकी 6 लाख 39 हजार 054 रुपयांचे कोटक महिंद्रा बँक, वाकड शाखेचे दोन चेक दिले. फिर्यादीने चेक बँकेत जमा केले. मात्र अमर भूमकर याने बँकेला चेक थांबविण्यास कळवून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.या प्रकरणात फिर्यादीची 12 लाख 78 हजार 108 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आर्थिक फसवणूक करणार्‍या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल आर्थिक फसवणूक करणार्‍या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल Reviewed by ANN news network on ९/०५/२०२२ १०:४५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.