Police e news

लोणावळा : रेल्वेच्या सफ़ाई कामगार महिलेवर कोयत्याने हल्ला



लोणावळा : कचरा कुंडीत कचरा न टाकता इतरत्र टाकणा-या एका व्यक्तीला हटकल्यामुळे त्याने रेल्वेच्या महिला सफ़ाई कामगारावर कोयत्याने हल्ला केला. लोणावळा रेल्वेस्टेशनवर हा प्रकार बुधवारी सकाळी घडला. या प्रकारात सफ़ाई कामगार महिला गंभीर जखमी झाली असून पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. 

सचिन एकनाथ पवार (वय ३१, रा. आपटी, भोर, पुणे) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याप्रकरणी रेल्वे महिला सफाई कामगार असलेल्या अलका राजू साबळे (वय- ३८, रा. करंजगाव, मावळ) यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलका साबळे या लोणावळा रेल्वे स्टेशन येथे सफाई कामगार म्हणून काम करतात. बुधवारी (दि.१२ ऑक्टोबर) सकाळी त्या नेहमीप्रमाणे साफसफाईचे काम करत असताना लोणावळा रेल्वे स्थानकाच्या तिकीट घराजवळील रेल्वे उड्डाणपूलाच्या पायऱ्यावर सचिन पवार हा कचरा टाकत होता म्हणून साबळे यांनी त्याला इतरत्र कचरा टाकू नका तो कचरा कुंडीत टाका असे सांगितले. काही वेळानंतर त्या पुढे रेल्वेच्या वाहन तळाच्या येथे साफसफाई करत असताना पुन्हा एकदा सचिन पवार याने वाहन तळाच्या येथेही कचरा टाकल्याने साबळे यांनी त्याला परत हटकले. या गोष्टीचा राग आल्याने सचिन पवार याने त्याच्या जवळ असलेल्या पिशवीतील लोखंडी कोयत्याने अलका साबळे यांना मारहाण केली. या मारहाणीत साबळे यांच्या डाव्या खांद्याला आणि डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी सचिन पवार याला ताब्यात घेत अटक केली आहे. तर या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील पोवार हे करीत आहेत.

लोणावळा : रेल्वेच्या सफ़ाई कामगार महिलेवर कोयत्याने हल्ला लोणावळा : रेल्वेच्या सफ़ाई कामगार महिलेवर कोयत्याने हल्ला Reviewed by ANN news network on १०/१३/२०२२ ०८:१९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.