Police e news

चाकण आणि चिंचवडगाव येथील दुकानातून दागिने लांबवले

पिंपरी : चाकण आणि चिंचवडगाव येथील सराफी दुकानात गुरुवारी ग्राहक म्हणून आलेल्या महिलांनी विक्रेत्यांची नजर चुकवून दागिने लांबविले. या दोन्ही प्रकारांमध्ये एकंदर 88 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. चाकण येथील चंदूकाका सराफ आणि चिंचवडगाव येथील पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स या सराफी दुकानात या घटना घडल्या आहेत. रणजित जगन्नाथ पवार (वय 48, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण मार्केटयार्ड परिसरात चंदूकाका सराफ हे सोन्याचे दुकान आहे. फिर्यादी या दुकानात काम करतात. 25 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास एक अनोळखी महिला दुकानात सोन्याची अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने आली. तिने सोन्याच्या अंगठ्याच्या डिस्प्ले फोल्डर मधून 7.190 ग्रॅम वजनाची 38 हजार 600 रुपये किमतीची अंगठी हातचलाखीने काढून घेतली. त्यानंतर डिस्प्लेच्या फोल्डरमध्ये दुसरी नकली अंगठी ठेवली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत. दुसरी फिर्याद मीनाक्षी अतुल दाभाडे (वय 49, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार 25 ते 30 वयोगटातील अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मीनाक्षी या चिंचवडगाव येथील पु ना गाडगीळ अँड सन्स या सराफी दुकानात सेल्समन म्हणून काम करतात. 25 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या कालावधीत एक अनोळखी महिला दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने आली. तिने हातचलाखी करून दुकानातील ट्रे मधील 11.880 ग्रॅम वजनाची 50 हजार रुपये किमतीची शिव प्रतिज्ञा कोरलेली सोन्याची अंगठी चोरली. त्या अंगठीच्या जागी पांढरे खडे असलेली व बारकोड लावलेली नकली अंगठी ठेऊन निघून गेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
चाकण आणि चिंचवडगाव येथील दुकानातून दागिने लांबवले चाकण आणि चिंचवडगाव येथील दुकानातून दागिने लांबवले Reviewed by ANN news network on ११/२८/२०२१ ०१:०३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.