Police e news

तरुणीला अश्लील संदेश पाठवणारा गजाआड

खडकी : व्यायामशाळेत व्यायामासाठी येणा-या तरुणीला वारंवार अश्लील संदेश पाठविणा-या वाकड येथील व्यायामशाळा प्रशिक्षकाला खडकी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अमित आनंद गायकवाड (वय ३४, रा. वाकड) असे या प्रशिक्षकाचे नाव असून याप्रकरणी कोल्हापूर येथील एका २६ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. खडकी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी या खडकी येथील व्यायामशाळेत डिसेंबर २०१६ मध्ये जात होत्या. त्यावेळी अमित गायकवाड त्यांचा प्रशिक्षक होता. त्या वेळी त्याने फिर्यादीचा मोबाईल नंबर घेऊन त्यावर इन्स्टाग्राम व फेसबुकच्या माध्यमातून त्यांना वारंवार अश्लिल संदेश पाठविले. फिर्यादी यांचा पाठलाग करुन लग्न करण्याविषयी त्यांच्याकडे आग्रह धरला. त्यानंतर त्या कोल्हापूर येथे रहायला गेल्या. तेथेही त्याने त्रास देण्यास सुरुवात केल्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी अमित गायकवाडला अटक केली आहे.
तरुणीला अश्लील संदेश पाठवणारा गजाआड तरुणीला अश्लील संदेश पाठवणारा गजाआड Reviewed by ANN news network on १/०७/२०२२ ०९:१८:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.