464 हरविल्या व्यक्तींचा एका वर्षात शोध
भोसरी पोलिसांची उत्तम कामगिरी
भोसरी : भोसरी पोलिसांनी हरवलेल्या 464 व्यक्तींचा एका वर्षाच्या आत शोध लावून त्यांना घरी पोहचविले आहे.
भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष शोध पथक तयार करण्यात आले होते. या पथकातील सचिन जाधव यांनी मागील 27 वर्षांतील 309 बेपत्ता व्यक्तींचा एक वर्षाच्या आत शोध लावला आहे.
तसेच 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या कालावधीमध्ये विशेष मोहीम राबवून भोसरी पोलीस स्टेशनमधील एकूण 40 पोलीस अंमलदारांनी 200 पैकी 155 बेपत्ता व्यक्तींचा शोध लावून त्यांना कुटुंबियाकडे सुखरूप सुपूर्द केले. अशा प्रकारे भोसरी पोलिसांनी 464 हरवलेल्या व्यक्तींचा शोध लावण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
464 हरविल्या व्यक्तींचा एका वर्षात शोध; भोसरी पोलिसांची उत्तम कामगिरी
Reviewed by ANN news network
on
९/२२/२०२२ ०४:५८:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: