Police e news

संकलित गुन्हे वृत्त दि.23 सप्टेंबर 2022

भरदिवसा पाठलाग करून महिलेचा विनयभंग निगडी : गंगानगर, निगडी परिसरात गुरुवारी सकाळी साडेेअकरा ते सव्वाबाराच्या सुमारास एका महिलेचा एका टोळक्याने पाठलाग केला.ती महिला जीव वाचविण्यासाठी सार्वजनिक शौचालयात शिरली असता तिथे घुसून त्या टोळक्याने तिचे कपडे फाडले, डोळ्यात मिरचीपूड टाकली, ब्लेडने हातावर वार करून तिचे कपडे फाडले. याप्रकरणी पीडितेच्या बहिणीने निगडी पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी चेतन मारूती घाडगे (वय 31 रा. औंधगाव) याला अटक केली आहे. त्याचे तीन साथीदार फरार आहेत. फिर्यादीची बहीण निगडीतील बेल्हेश्वर मंदिरात दर्शन घेऊन येत असताना मक्याचे कणीस घेण्यासाठी थांबली.आरोपींनी दुचाकीवरून येऊन काढ रे काढ कोयता आज हिच्यावर वारच करू अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्यादीची बहीण पळत जवळ असलेल्या सुलभ शौचालयात गेली. आरोपी तिथे गेले. त्यांनी तिच्या अंगावर दारू ओतली व तिच्या डोळ्यात मिरचीपूड घातली. तिला मिरचीपूड खायलाही लावली. तिच्या हातावर ब्लेडने वार केले. तिचे सर्व कपडे फाडले व निघून गेले. ------------------------- तरुणीला शिवीगाळ; दाम्पत्यावर गुन्हा पिंपरी : विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी येथे सोसायटीच्या पाण्याच्या टाकीचा नळ तोडत असलेल्या दाम्पत्याला एका तरुणीने अडविले. त्यावेळी त्या दाम्पत्याने तरुणीला शिवीगाळ केली. या प्रकरणी त्या तरुणीने पिंपरी पोलीसठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून संजय कांबळे (वय 45 रा. पिंपरी) व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. आरोपी सोसायटीच्या टाकीतून पाणी आणण्यासाठी गेले होते. ते जाणून बुजून पाण्याच्या टाकीचा नळ तोडत असताना फिर्यादीने त्यांना अडवले.त्यानंतर आरोपींनी तुला खोट्या गुन्ह्यात अडकवतो असे म्हणत फिर्यादीला अश्‍लील व अर्वाच्य शिवीगाळ केली. ----------------------------- आत्महत्येस प्रवृत्त केले; एकावर गुन्हा दाखल हिंजवडी : विवाहित महिलेशी प्रेमसंबंध ठेवून तिच्या पतीचा मानसिक छळ करत त्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा प्रकार जुलै ते 17 सप्टेंबर 2022 या काळात मारुंजी येथे घडला आहे. या प्रकरणी आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या भावाने हिंजवडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यावरून अजिंक्य शिवाजी घुले (रा. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तिच्या लग्नानंतरही हे संबंध चालू होते.याचा जाब त्या मुलीच्या पतीने आरोपीला विचारला असता आरोपीने त्याला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यामुलीच्या पतीने पत्नीसह मारुंजी येथे येऊन संसार थाटला. आरोपी हा तेथेही येऊ लागला. आरोपीने त्या मुलीच्या पतीला जे करायच ते कर एक दिवस तुझा काटा काढतो, तुझ्या बायकोला मी घेऊन जाणार अशी धमकी दिली. यामुळे त्या मुलीच्या पतीने 17 सप्टेंबर रोजी मारूंजी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. ------------------------------ पोलिसाला धमकी देणारा रिक्षाचालक अटकेत पिंपरी : पोलिसाला आपल्या पत्नीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणार्‍या एका रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या पत्नीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरीतील साई चौकात बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलीस हवालदार हृषिकेश पांडुरंग पाटील (वय 45) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून रिक्षाचालक आनंद सुरेश हिरेकर (वय 36 रा. पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या पत्नी विरोधातही गुन्ह दाखल केला आहे. फिर्यादीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आरोपीच्या रिक्षाचे इ चलन काढले. त्यामुळे आरोपी व त्याच्या पत्नीने फिर्यादीच्या अधिकार्‍यावर तुम्ही माझ्या बायकोशी गैरवर्तन करत आहात म्हणून तुमचे पण नाव देतो म्हणत कारवाई न करण्यासाठी दबाव आणला व पोलिसांना शिवीगाळ केली. -------------------- बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक पिंपरी : कासारवाडी येथील दोघांनी एकाच जागेचा विकसन करारनामा दोघांशी करून एका बांधकाम व्यावसायिकाला 1 कोटी 5 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. सन 2003 ते 22 सप्टेंबर 2022 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी महेश अमरसी सपारिया (रा. दवाबाजार, चिंचवड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून भगवान खंडू चव्हाण (वय 90, रा. कासारवाडी), किशोर विष्णू चव्हाण (वय 58, रा. वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादीसोबत कासारवाडी येथील एका जागेचा सन 2003 मध्ये विकसन करारनामा केला. सन 2018 पर्यंत त्यांनी फिर्यादी कडून हक्कसोड, वाटणीपत्र, भाड्यासाठी वेळोवेळी 1 कोटी 5 लाख 69 हजार 108 रुपये घेतले. फिर्यादी सोबत विकसन करारनामा झालेला असतानाही आरोपींनी सन 2017 मध्ये स्कायलाईन डेव्हलपर्स यांच्याशी पुन्हा विकसन करारनामा व खरेदीखत केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. -----------------------------------
संकलित गुन्हे वृत्त दि.23 सप्टेंबर 2022 संकलित गुन्हे वृत्त दि.23 सप्टेंबर 2022 Reviewed by ANN news network on ९/२३/२०२२ ०२:५१:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.