Police e news

लोणावळ्यात विनामास्क फिरणा-यांवर कारवाई

लोणावळा : लोणावळा शहर व ग्रामीण भागामध्ये कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्याने त्यावर नियंत्रण आणण्याकरिता शासनाच्या आदेशाप्रमाणे लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कडून विना मास्क फिरणा-यांवर कडक दंडात्मक कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी वरसोली टोलनाका येथे ६८ जणांवर कारवाई केली असून लोणावळा शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक गवळीवाडा येथील कुमार चौक या ठिकाणी शुक्रवारी सकाळपासून धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. मास्क न लावता फिरणा-या प्रत्येकाला पाचशे रुपये प्रमाणे दंड आकारणी केली जात आहे. याविषयी बोलताना पोलीस निरीक्षक सिताराम डुबल म्हणाले कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, विना मास्क कोणीही रस्त्यावर फिरु नये, दुकानदार व हॉटेल मधील कर्मचारी यांनी देखील मास्कचा वापर करावा अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील मास्क लावल्याशिवाय बाहेर फिरु नये तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी केले आहे. लोणावळा नगरपरिषदेकडून देखील बाजार भागात विनामास्क फिरणा-यांवर कारवाई मोहिम सुरु केली आहे.
लोणावळ्यात विनामास्क फिरणा-यांवर कारवाई लोणावळ्यात विनामास्क फिरणा-यांवर कारवाई Reviewed by ANN news network on १/०७/२०२२ ०९:२०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.