लोणावळा : लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून लग्न न करता पसार झालेल्या एकाला लोणावळा पोलिसांनी मोठ्या शिताफीने नुकतेच गजाआड केले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इरफान इस्माईल शेख (वय २६ वर्ष, रा. भांगरवाडी रेल्वे गेट जवळ, भांगरवाडी, लोणावळा) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित युवतीने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून आरोपी इरफान शेख याने फिर्यादी युवतीला लग्नाचे अमिश दाखवून तिचा विश्वास संपादन केला. तद्नंतर जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२१ रोजी पर्यंत आरोपीने त्याच्या मित्राच्या रेल्वे गेट भांगरवाडी येथील रिकाम्या फ्लॅटवर फिर्यादी युवतीला बोलावून त्याठिकाणी तसेच नंतर डिसेंबर २०२१ मध्ये चिंचवड येथील एका लॉजवर तिला घेवून जावून त्याठिकाणी तिची इच्छा नसताना तिच्याशी शरीर संबंध ठेवले. तसेच तिला मारहान तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
पीडित युवतीने लोणावळा पोलिसांकडे धाव घेतली असता सदर आरोपी फरार झाला होता. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील आणि पो.नी. सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नी. सतीश शिंदे, पो.स.ई. मुजावर, पो. ना. हनुमंत शिंदे, जयराज पाटणकर, नितीन सूर्यवंशी, मनोज मोरे, स्वप्नील पाटील, अजीज मिस्त्री यांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली. संबंधित आरोपीच्या विरोधात भा.द.वि. कलम ३७६(२)(एन), ३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पो.स.ई. मुजावर हे करीत आहे.
लग्नाचे आमिष दाखवून युवतीची फसवणूक करणारा गजाआड
Reviewed by ANN news network
on
१/०७/२०२२ ०९:३७:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: