पिंपरी : भोसरी,मोशी, चिखली आणि देहू येथे रविवारी आत्महत्येच्या चार घटना उघडकीस आल्या आहेत.
भोसरीतील सुपडाजी हरिभाऊ तायडे (वय २७, रा. सदगुरूनगर, भोसरी) यांनी शनिवारी सायंकाळी राहत्या घरात पंख्याच्या हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला.
मोशी येथील प्रशांत रखमाजी माटे (वय ४३, रा. मोशी) यांनी दोन दिवसांपूर्वी त्याने विष प्राशन केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. चिखलीतील शुभम हरदिास इंगळे (वय १९, रा. चिखली) याने त्याचा सहकारी शनिवारी रात्री त्याचा जेवण्यासाठी गेला असता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तो मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील असून मोलमजुरीचे काम करीत होता.देहू येथे कल्पना निरंजन सरदार (वय २६, रा. देहूगाव) या विवाहितेने आजारपणाला कंटाळून राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पिंपरी चिंचवड परिसरात ४ आत्महत्या
Reviewed by ANN news network
on
१/१०/२०२२ ०८:५२:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: