भोसरी : भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली ७ डिसेंबर रोजी दुपारी एका वृद्धेला सोन्याच्या बिस्किटांचे आमिष दाखवून तीन अनोळखी व्यक्तींनी तिचे मंगळसूत्र लांबविले. याप्रकरणी ९ जानेवारी २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमल जयसिंग आदक (वय ६०, रा. गवळी नगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र काढण्यास आरोपींनी फिर्यादी यांना भाग पाडले. त्यानंतर फसवणूक करून आरोपींनी फिर्यादी यांचे मंगळसूत्र लांबविले
भोसरीत वृद्धेचे मंगळसूत्र लांबविले
Reviewed by ANN news network
on
१/१०/२०२२ ०८:५७:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: