Police e news

पिंपळे गुरव येथे तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

पिंपळे गुरव : पूजा हॉस्पिटल चौक, पिंपळे गुरव येथे गुरूवारी रात्री अकराच्या सुमारास जेवण करण्यासाठी निघालेल्या तरूणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न एकाने केला. रोहन गणपत जोशी (वय २२, रा. दापोडी, पुणे) यांनी शुक्रवारी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार क्षितिज कसाळे (पूर्ण नाव माहिती नाही) (रा. पिंपळे गुरव) व इतरांविरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रोहन जोशी आपल्या मित्रासोबत जेवण करण्यासाठी निघाले होते. दरम्यान, साडेअकराच्या सुमारास रामकृष्ण मंगल कार्यालय, पिंपळे गुरव येथे थांबले होते. त्यावेळी तिथे हातात रॉड, कोयता घेऊन आरोपी आले व फिर्यादी यांना नाव, पत्ता विचारत मारहाण करू लागले. यावेळी एका आरोपीने फिर्यादी यांच्या डोक्याच्या मध्यभागी कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले असे फिर्यादीत म्हटले आहे.
पिंपळे गुरव येथे तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न पिंपळे गुरव येथे तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न Reviewed by ANN news network on १/०८/२०२२ ०८:५४:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.