सेनादलातील बडे अधिकारी अडकण्याची शक्यता
पिंपरी : बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून काही तरुणांची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून याप्रकरणी सेनादलातील दोन निवृत कर्मचार्यांसह अन्य एकाला पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी हा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक नेमले असून यामुळे सेनादल भरतीतील मोठा गैरव्यवहार उघडकीस येण्याची तसेच सेनादलातील काही अधिकारीही या प्रकरणात अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विशेष तपास पथकात सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार, सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, उपनिरीक्षक मिनीनाथ वरुडे यांचा समावेश आहे.
सतीश कुंडलिक डहाणे (वय 40, रा. औंध मिलिटरी कॅम्प, पुणे), श्रीराम बनाजी कदम, अक्षय देवलाल वानखेडे (रा. तेल्हारा, जि. अकोला) या तिघांना फसवणूक प्रकरणात अटक केली आहे. बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपींनी तरुणांकडून हजारो रुपये घेऊन फसवणूक केली. सेना गुप्तचर विभागाने तीन संशयिताना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
आरोपी सतीश डहाणे व श्रीराम कदम हे दोघेही सेनादलातून निवृत्त झालेले आहेत. अक्षय वानखेडे हा याप्रकरणात एजंट म्हणून काम करीत असल्याचे समोर आले आहे. यात सेनादलातील बड्या अधिकार्यांचा समोवश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अधिक तपासासाठी सेना गुप्तचर विभाग देखील सहकार्य करणार आहे.
’बीआरओ’ नोकरभरती प्रकरणाचा तपास ’एसआयटी’कडे
Reviewed by ANN news network
on
१/०९/२०२२ ०८:०४:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: