पिंपरी : एमआयडीसी भोसरी परिसरात शुक्रवारी सायंकाळी रस्त्याने पायी जात असलेल्या तिघांचे मोबाइल दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी हिसकावून नेले.
हृषिकेश प्रकाश फडतरे,मेहफूज सत्तार शेख,वर्षा बाळासाहेब थोरात अशी मोबाईल हिसकावलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हृषिकेश प्रकाश फडतरे (वय 25, रा. भगतवस्ती, भोसरी), यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फडतरे हे शुक्रवारी सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास स्वामी समर्थ शाळा, एमआयडीसी भोसरी येथून रस्त्याने पायी चालले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या हातातील सहा हजार रुपये किंमतीचा मोबाइल हिसकावून नेला. त्यानंतर चोरट्यांनी मेहफूज सतार शेख यांचा 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन हिसकावला. तसेच वर्षा बाळासाहेब थोरात यांचा तीन हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन हिसकावला, असे एकूण 19 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाइल चोरट्यांनी चोरून नेले.
भोसरी एमआयडीसीमध्ये तीन पादचार्यांचे मोबाइल हिसकावले
Reviewed by ANN news network
on
१/०९/२०२२ ०८:०३:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: