तळेगाव दाभाडे : सद्यस्थितीमध्ये आईवडील दोघेही पैसा मिळवण्यासाठी बाहेर पडतात.ते पैसे कोणासाठी कमावतात तर मुलांसाठी. परंतु मुलेच जर असंस्कारक्षम राहिली. चुकीच्या संगतीने बिघडली तर मिळवलेल्या पैशाचा उपयोग तरी काय? म्हणून आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा. चांगली संगत, गुण जपायला सांगा.असे मत सहविचार सभेत तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी व्यक्त केले.
येथील इंद्रायणी महाविद्यालयात मुख्याध्यापक आणि पोलीस सहविचार सभा झाली.त्यावेळी सावंत बोलत होते. यावेळी तळेगाव परिसरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी, प्राचार्य, उपप्राचार्य उपस्थित होते.
सावंत म्हणाले शाळा कॉलेजमधील मुलांवर संस्कार करणारा घटक आई वडिलांनंतर जर कोणता असेल तर तो गुरुजन वर्ग आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन शिक्षकांनी त्यांच्या पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा, या प्रसंगी तळेगाव नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी गोतरणे म्हणाल्या भावी पिढीला येणार्याव समस्या म्हणजे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहून आपल्या संस्कारांना महत्त्व दिले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आर .आर डोके,यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संदीप भोसले यांनी केले व आभार प्रा. यु.एस खाडप यांनी केले. कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी तळेगाव पोलिस स्टेशनचे प्रशांत वाबळे,प्राजक्ता धापटे, बाबाराजे मुंडे, प्राध्यापक व सर्व मुख्याध्यापक, प्रतिनिधी, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी सहकार्य केले.
आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा : पोलीस निरीक्षक मधुकर सावंत
Reviewed by ANN news network
on
२/०६/२०२२ ०९:०१:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: