लोणावळा : लोणावळ्यात चुकीच्या ठिकाणी ’यूु’ टर्न घेण्यापासून रोखत असताना घेतलेल्या फोटोवर आक्षेप घेत मोटारीचा फोटो का घेतला अशी विचारणा करीत मोटारीत बसलेल्या तिघांनी ट्रॅफिक वॉर्डनला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी संबंधित तिघाजणांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी लोणावळा नगरपरिषद ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करीत असलेल्या साबीर मज्जीद शेख (वय 45 वर्षे) याने फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार साबीर शेख हा रविवारी जयचंद चौक येथे कर्तव्यावर असताना सकाळी 11:30 वा. च्या सुमारास कुपर चिक्की समोर पार्कींग मध्ये लावलेल्या एक कार (क्र.एम. एच. 12 एस.वाय. 2012) चालकाने त्याठिकाणी ’यूु’ टर्न घेण्याची जागा नसताना देखील जागेवरच यु टर्न घेवून गाडी वळविण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोन्हीं बाजुकडून येणारी वाहतुक ठप्प झाली. त्यामुळे वार्डन शेख याने सदर कारचा फोटो काढला. यावर कार चालकाने कार रोड मध्ये आडवी उभी करून वार्डन शेख याला कार मधुन खाली उतरून ’माझ्या गाडीचा फोटो का काढला’ असे विचारले. त्यावर शेख याने त्यास तुम्ही चुकीचे ठिकाणी ’यूु ’ टर्न घेवून वाहतूुक कोंडी केल्याचे सांगीतले असता कार चालकाने आरेरावीची भाषा करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी कार मध्ये बसलेले आणखी दोन वयस्कर व्यक्ती देखील कार मधून खाली उतरून शेख याच्या जवळ आल्या. त्यानंतर कार चालकाने वार्डन शेख याला हाताने धक्का देवून खाली पाडले आणि सोबतच्या दोन्ही व्यक्तींबरोबर शेख याला लाथाबुक्याने मारहाण केली.
संबंधित तिघेजण वार्डन शेख याला मारहाण करीत असल्याचे पाहुन जवळच असलेले वाहतुक नियमन करणारे पोलीस हवालदार शिंदे यांनी तिथे येवून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित तिघांनी शिंदे यांच्याशी देखील हुज्जत घालत त्यांना अरेरावीची भाषा वापरली. तेव्हा तेथे उपस्थित असलेले इतर दुकाणदार, रिक्षा चालक तसेच रस्त्याने जाणार्या नागरिकांनी संबंधित तिघांच्या तावडीतून वार्डन शेख याला बाजुला घेतले. या मारहाणीत वार्डन शेख यांच्या डाव्या हाताचे कोपर्यालच्यावर जखम झाली असुन पाठीत तसेच कमरेवर मुकामार लागला आहे.
याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी विवेक अशोक कौल (वय 38 वर्षे, रा. वाघोली ता. हवेली जि. पुणे), अशोककुमार श्रीकांत कौल (वय 68 वर्षे, ता. चौरासी, सुरत, गुजरात) आणि विरेंद्र श्रीकांत कौल (वय 65 वर्षे, रा. गुडगाव, हरियाणा) या तिघांना अटक केली असून त्यांच्या विरोधात भा.द. वि. कलम 353, 332, मोटार वाहन कायदा कलम 119 अन्वये कायदेशीर कारवाई केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पो. नि. सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप.नि.सुरेखा शिंदे या करीत आहेत.
ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण करणारे तिघेजण गजाआड
Reviewed by ANN news network
on
२/०६/२०२२ ०९:०३:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: